मागील अडीच वर्षांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देश हार मानायला तयार नाहीत. त्यातही रशियाचे पारडे जड झालेय. गेल्या काही महिन्यांपासून युक्रेनचे युद्धात खूप नुकसान होतेय. रशियाच्या सैन्याने युक्रेनची अनेक तळे उद्ध्वस्त केली आहेत. 14 जून रोजी रशियाने युक्रेनच्या 420 चौरस किलोमीटर भागावर ताबा मिळवलाय. एवढेच नव्हे तर रशियाने सैन्याने युक्रेनचे आणखी एक शहर ताब्यात घेतले. मंगळवारी रशियन सैन्याने डोनेट्स्क क्षेत्रात टिमोफिइवका गावावर झेंडा फडकवला. 22 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने पूर्ण ताकद लावून युक्रेनवर हल्ला चढवला, तेव्हा हे युद्ध एवढे दीर्घकाळ चालेल आणि लाखो लोक मारले जातील याचा पुतीन यांना अंदाज नव्हता. अमेरिकेच्या मदतीने युक्रेन रशियाविरोधातील युद्धात आग ओकत आहे.