गेल्या काही वर्षात अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून इतर राज्यात गेले आहेत. आता कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेली एक कंपनी मुंबईतून निघणार आहे. या कंपनीचे मुख्यालय बंगरुळूत शिफ्ट होणार आहे. मुंबईत आकारलं जाणारं अव्वाच्या सव्वा भाडं यासाठी कारणीभूत ठरले आहे.
आदित पलिचा आणि कैवल्य वोहरा या दोन तरुणांनी झेप्टो या ऑनलाईन डिलिव्हरी सेवा देणाऱ्या कंपनीची स्थापना केली होती. काही वर्षात या कंपनीची उलाढाल 3.6 बिलियन डॉलरच्या घरात गेली. झेप्टोचे मुख्य ऑफिस जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील वी वर्क इमारतीत होतं. या इमारतीत झेप्टोचं 90 हजार स्केअर फुटचं ऑफिस आहे. पण इथे या ऑफिसचं भाडं जास्त असल्याने झेप्टो मुंबईतला गाशा गुंडाळणार आहे. झेप्टोचं एक कार्यायल मुंबईत असणार आहे, पण मुख्य कार्यालय बंगरुळुला शिफ्ट होणार आहे. यामुळे कंपनीचे भाड्यापोटी जाणारे महिन्याला 40 ते 50 लाख रुपयांची बचत होईस असे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीचे को फाऊंडर कैवल्य वोहरा बंगरुळूत दाखल झाले आहेत आणि त्यांनी कामही सुरू केले आहे. बंगरुळूत सध्या झेप्टोचे 40 हजार स्केअर फुटाचे ऑफिस आहे. तसेच 700 कर्मचारी कार्यरत आहेत. कंपनी आणखी 400 जणांची भरती करणार आहे. कंपनीने मुंबईतल्या अनेक कर्मचाऱ्यांना बंगरुळूत शिफ्ट होण्याचे आवाहन केले आहे.
झेप्टोचे प्रतिस्पर्धी असलेल्या स्विगी आणि फ्लिपकार्टचे मुख्य कार्यालय बंगरुळूतच आहे. दक्षिण भारतात व्यवसाय वाढवण्यासाठी झेप्टोने हे पाऊल उचलेले आहे. आणि मुंबईच्या तुलनेत बंगरुळूत भाडं कमी असल्याने झेप्टोसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. मुंबईत ज्या ठिकाणी झेप्टोचं ऑफिस होतं तिथे एका स्केअर फिटमागे 150 ते 170 रुपये भाडं आकारलं जातं. तर बंगरुळूत एका स्केअर फुटासाठी 50 चे 45 रुपये आकारले जाते. यामुळे झेप्टो कंपनीचे 40 ते 50 लाख वाचणार आहेत.