देशातील बँकांकडून सर्व्हिस चार्जच्या नावाखाली ग्राहकांची नुसती लूट सुरू आहे. मिनिमम बॅलन्सपासून एटीएममधून किती वेळा पैसे काढायचे इथपर्यंत नुसते चार्ज लावले जात आहेत. बँक खात्यात जर पैसे नसतील आणि एटीएममधून पैसे काढण्याचा जितका वेळा प्रयत्न कराल तितका ग्राहकांना दंड आकारला जातो. बँकेचे पासबूक, नवीन एटीएम कार्डसाठीसुद्धा वेगवेगळे पैसे आकारले जात आहेत. वेगवेगळ्या बँकाचे वेगवेगळे चार्ज आहेत. सर्व्हिस चार्जच्या नावाखाली कापल्या जाणाऱ्या पैशांची अनेक ग्राहक तक्रार करतात. परंतु, बँकेचे अधिकारी नियमाकडे बोट दाखवतात.
किती शुल्क आकारणी…
– डुप्लिकेट पासबुक 100 रुपये – चेक रिटर्न चार्ज (1 लाखांपर्यंत) 300 रुपये – चेक रिटर्न चार्ज (1 कोटीपर्यंत) 500 रुपये – हस्ताक्षर पडताळणी 100 रुपये – हस्ताक्षर पडताळणी (संयुक्त खाते) 150 रुपये – खाते नामनिर्देशन बदलणे 100 रुपये – पासबुक व अन्य कागदपत्रे 100 रुपये – पाचपेक्षा अधिक वेळा पैसे काढणे 150 रुपये (प्रतिव्यवहार)
– अलीकडे ऑनलाईन पेमेंट तसेच रिचार्ज सेवा देणाऱ्या कंपन्यांनीही प्रतिरिचार्ज 1.5 रुपये ते 2.5 रुपये जादा वसूल करणे सुरू केले आहे.
– ई-केवायसी 10 रुपये
– व्याज प्रमाणपत्र 100 रुपये (पहिल्यांदा मोफत)
-ऑनलाईन खरेदी, फूड डिलिव्हरी, डिजिटल पेमेंटसाठी काही प्लॅटफॉर्मची मदत घ्यावी लागते. परंतु बँका आणि विविध सेवा देणारे प्लॅटफॉर्म सर्व्हिस चार्जच्या नावाखाली खात्यातून जादा पैसे कापून घेऊ लागल्या आहेत.
मनी ट्रान्स्फर शुल्क
आरटीजीएस प्रतिस्टेटमेंट 25 रुपये
2 लाखांपर्यंत शुल्क नाही
2 ते 5 लाख 25 रुपये प्रतिव्यवहार
5 लाखांपेक्षा अधिक 49 रुपये प्रतिव्यवहार
एनईएफटी
10 हजार रुपयांपर्यंत 2 रुपये
10 हजारांपेक्षा अधिक 4.5 रुपये
1 ते 2 लाख 14 रुपये
2 लाखांहून अधिक
24 रुपये