‘सेफ वेब फॉर चिल्ड्रन’ कार्यक्रमाचे आज उद्घाटन
राज्य बाल हक्क संरक्षण आयोग मुलांचे ऑनलाइन लैंगिक शोषण आणि अत्याचार विरुद्ध लढा या उपक्रमांतर्गत सेफ वेब फॉर चिल्ड्रन हा कार्यक्रम राबवत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मंगळवार, 6 ऑगस्टला दुपारी 4 वाजता, सह्याद्री अतिथीगृह येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व चाईल्ड फंड इंडिया यांच्या वतीने ऑनलाइन लैंगिक शोषणासंबंधी राज्यातील सर्व वयोगटातील मुले व सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी आणि प्रचार, प्रसार, व्हावा यासाठी जिल्हास्तरावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
होमगार्ड नोंदणीसाठी 14 ऑगस्टपर्यंत अर्ज
सध्या होमगार्ड नोंदणीसाठी 14 ऑगस्ट कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पोलीस दलाच्या मागणीनुसार, आपत्कालीन परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था परिस्थितीमध्ये कर्तव्य दिली जातात. होमगार्ड सदस्यत्व घेतलेल्या सदस्यांना विनामूल्य सैनिकी, अग्निशमन, प्रथमोपचार प्रशिक्षण, गौरवास्पद कामगिरी केल्यास विविध पुरस्कार व पदके, तीन वर्ष सेवा पूर्ण झालेल्या होमगार्डना राज्य पोलीस दल, वन, अग्निशमन दलामध्ये 5 टक्के आरक्षण, स्वतःचा व्यवसाय सांभाळत देशसेवा करण्याची संधी मिळते. होमगार्डसाठी शैक्षणिक पात्रता कमीत कमी इयत्ता दहावी उत्तीर्ण आहे. होमगार्डकरिता https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर इंग्रजी भाषेत ऑनलाइन अर्ज 14 ऑगस्टपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत करता येणार आहे. होमगार्ड कार्यालय 022-22842423 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.