एकेकाळी आपल्या स्टायलिश फलंदाजीमुळे क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत असलेला डावखुरा फलंदाज विनोद कांबळी दारूच्या नशेत धडपडत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. पांढरी दाढी वाढलेला आणि उभंही राहता येत नसलेला कांबळी दारूच्या नशेत होता आणि त्याला आपली बाईकही सावरता येत नसल्याचे दिसत आहे. पांढऱया दाढीत असल्याने कांबळीला ओळखणेही कठीण झाले होते. पण काही पादचाऱयांनी त्याला ओळखले आणि त्याला आधार देत फुटपाथवर आणले. मात्र हा व्हिडीओ सध्याचा आहे की जुना आहे, याबाबत मात्र काही कळू शकलेले नाही.