हिंदुस्थानी महिलांचा टेबल टेनिसमध्ये ऐतिहासिक विजय

हिंदुस्थानच्या महिला टेबल टेनिस संघाने सोमवारी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक विजय संपादन केला. 11व्या मानांकित हिंदुस्थानी संघाने चतुर्थ मानांकित रोमानियाचा चुरशीच्या लढतीत 3-2 फरकाने पराभव करत हिंदुस्थानी महिलांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. महिला संघाने ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठली हे विशेष.

  1. श्रीजा अकुला व अर्चना कामथ या हिंदुस्थानी जोडीने रोमानियाच्या एडिना डियाकोनू व एलिजाबेत समारा या जोडीचा 11-9, 12-10, 11-7 असा पराभव करीत हिंदुस्थानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू मनिका बत्राने महिला एकेरीच्या लढतीत रोमानियाच्या बर्नाडेट स्जोक्स हिचा 11-5, 11-7, 11-7 असा धुव्वा उडवत हिंदुस्थानला 2-0 असे आघाडीवर नेले. मात्र, त्यानंतर महिला एकेरीच्या दुसऱया लढतीत हिंदुस्थानच्या श्रीजा अकुला हिला एलिजाबेत समाराने 8-11, 11-4, 7-11, 11-6, 11-8 असे पराभूत करीत रोमानियासाठी 1-2 असे अंतर कमी केले.