एअरपोर्ट ऑथोरिटी ऑफ इंडियाने (एएआय ) आर्थिक वर्ष 2023-24 या आर्थिक वर्षात 101 विमानतळांच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी 796 कोटी रुपये खर्च केले आहेत. 2022-23 च्या तुलनेत ही रक्कम 20 टक्के जास्त आहे. 2021-22 या आर्थिक वर्षापासून एएआयचा विमानतळांवरील देखभाल दुरुस्तीचा खर्च सतत वाढतच आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने राज्यसभेत शेअर केलेल्या आकडेवारीनुसार, 2021-22 मध्ये दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी 535.02 कोटी रुपये खर्च झाला. एएआयने 121 विमानतळांसाठी खर्चाचे आकडे दिले आहेत.
29 जुलै रोजी राज्यसभेत लेखी उत्तरात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, विमानतळाच्या इमारती आणि पायाभूत सुविधांच्या स्ट्रक्चरल स्थिरतेचे थर्ड पार्टी ऑडिट करण्याचे निर्देश सर्व विमानतळ चालकांना देण्यात आलेले आहेत.