Kanwar Yatra News : शॉक लागून कावड यात्रेतल्या 9 भाविकांचा मृत्यू, बिहारमधली धक्कादायक घटना

बिहारमध्ये कावड यात्रेत एक भीषण अपघात झाला आहे. विजेचा धक्का लागून कावड यात्रेतल्या 9 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये बहुतांश तरुण होते. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वैशालीनगरमध्ये भाविकांची कावड यात्रा जात होती. कावड यात्रेत काही भाविक डीजे लावून प्रवास करत होती. तेव्हा त्यांची डीजेची ट्रॉली 11 हजार वोल्टच्या हाय टेन्शन वायरच्या संपर्कात आली. त्यानंतर ट्रॉलीवर असलेल्या 9 जणांना विजेचा धक्का बसला. उपस्थित नागरिकांनी विद्युत विभागाला फोन केला आणि वीज पुरवठा बंद करायला सांगितला. पण तोवर उशिर झाला होता. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांना आरोप केला की विद्युत विभागाला फोन करूनही कर्मचाऱ्यांनी वेळेत विद्युत पुरवठा बंद केला नाही, त्यामुळेच या तरुणांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला.