भाजप आमदाराच्या पेट्रोल पंपावर दरोडा, लाखो रुपयांची रोकड लांबवली

बिहारमध्ये एका भाजप आमदाराच्या पेट्रोल पंपावर चोरांनी दरोडा घातला आहे. या दरोड्यात चोरांनी लाखो रुपयांची रोख रक्कम घेऊन पसार झाले आहेत. दरम्यान या घटनेचा सीसीटीव्ही व्हायरल झाला आहे.

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये भाजप आमदार राजू सिंह यांच्या मालकीचा पेट्रोल पंप आहे. या पंपावर पेट्रोल भरण्याठी तीन तरुण बाईकवर आले. त्यांनी पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्याला पेट्रोल भरायला संगितले. त्यानंतर आरोपींनी पिस्तुल काढलं आणि पैसे मागितले. त्या कर्मचाऱ्याकडून दरोडेखोरांनी 30 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर दोन्ही आरोपी मॅनेजरच्या केबिनमध्ये गेले. तिथे बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी एक लाख 70 हजार रुपये घेतले. त्यानंतर दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरचे सीसीटीव्ही फोडले.

या दरोडेखोरांनी आणखी एक पेट्रोल पंप लुटायचा प्रयत्न केला. पण तिथे जास्त लोकांची गर्दी असल्याने त्यांनी तिथून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून चौकशी सुरू आहे.