शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शिवडी विधानसभा क्षेत्र, आमदार अजय चौधरी यांच्या पुढाकाराने आणि मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्यातून रविवार, 4 ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबीर होणार आहे. अभ्युदय एज्यकेशन सोसायटी शाळेत सकाळी 8 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे शिबीर पार पडणार आहे.
महाआरोग्य शिबिरात सामान्य रोग, रक्त तपासणी, मलेरिया आजाराची रक्त तपासणी, हाडांच्या ठिसूळपणाची तपासणी, स्थूलपणा तपासणी, फुप्फुसाची तपासणी, न्यूरोग्राफी, लसीकरण, नेत्र तपासणी, स्रीरोग तपासणी, बालरोग तपासणी, अस्थिव्यंग, मधुमेह तपासणी, त्वचारोग तपासणी तसेच पुरुष-महिलांसाठी ईसीजी तपासणी औषधवाटपही करण्यात येणार आहे. या शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी केली जाणार आहे. या महाआरोग्य शिबिरासाठी डॉ. वाझा यांचेदेखील सहकार्य लाभले आहे. तरी नागरिकांनी या महाआरोग्य शिबिराचा मोठय़ा संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अजय चौधरी यांनी केले आहे. या शिबिराचे नियोजन उपविभागप्रमुख गजानन चव्हाण यांनी केले आहे.