नोटबंदीनंतर चलनात आलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी चलनातून बाद केल्या होत्या. या नोटा चलनात येऊन फक्त सात वर्षे झाली होती. त्यानंतर एकाएकी त्या चलनातून मागे घेण्यात आल्या. या नोटांच्या छपाईवर आणि त्या नष्ट करण्यावर किती खर्च आला होता,याबाबत राज्यसभेत प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, जुलै 2016 ते जून 2017 आणि जुलै 2017 ते जून 2018 दरम्यान सर्व डिनॉमिनेशलवाल्या नोटांच्या छपाईवर 12877 कोटी रुपये खर्च आला होता. मात्र दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याच्या प्रक्रियेवर आलेला खर्च वेगळा असा मोजला गेलेला नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, दोन हजार रुपयांच्या चलनातून बाद अशा 370.2 कोटी नोटा होत्या. त्यांची किंमत 7.40 लाख कोटी रुपये आहे. जुलै 2016 ते जून 2017 आणि जुलै 2017 ते जून 2018 दरम्यान चलनातून बाद नोटांच्या छपाईवर 7965 कोटी व 4912 कोटी रुपये खर्च आला.
l 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 आणि एक हजार रुपयाची नोट मागे घेण्याचा निर्णय. l दोन हजार रुपयांच्या नोटा आणि 500 रुपयांच्या नव्या सीरीजच्या नव्या नोटा आणल्या. l दोन हजार रुपयाची एक नोट छापण्यास 3.54 रुपये खर्च आला. l अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, 19 मे 2023 रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा परत घेण्याची घोषणा केली, तेव्हा 3.56 लाख कोटा रुपयांच्या बँक नोट्स सर्क्युलेशनमध्ये होत्या.