लेहमध्ये तापमान वाढले आहे. त्याचा फटका विमान वाहतुकीला बसला आहे. गेली चार दिवस लेह विमानतळावरून उड्डाणं बंद आहेत. लेह विमानतळ हे जगातल्या सर्वात उंच ठिकाणी असलेल्या विमानतळांपैकी एक आहे. जेव्हा तापमान 32 डिग्री अशं सेल्सियवर पोहोचतं तेव्हा विमान उडायला अडचणी येतात. तापमान वाढल्याने 27 जुलैपासून आतापर्यंत 16 उड्डाणं रद्द झाली आहेत.
भारताच्या एअरपोर्ट ऑथारिटीने दिलेल्या माहितीनुसार हवामान बिघडल्याने उड्डाणं रद्द केली आहेत. लेह विमानतळावर दिवसाला 15-16 विमानं येतात. लेह विमानतळ हे समुद्र सपाटीपासून 3.3 किलोमीटवर आहे. त्यामुळे लेह विमानतळ हे जगातल्या सर्वात उंच ठिकाणी असलेल्या विमातळांपैकी एक आहे. उंच ठिकाणी हवेचं घनत्व कमी होतं, हवा पातळ होते आणि तापमान वाढल्याने विमानाच्या इंजिनाला उड्डाण घेण्यासाठी उर्जा मिळत नाही अशी माहिती वरिष्ठ पायलट्संनी दिली आहे. लेहमध्ये पहिल्यांदाच तापमान वाढल्याने उड्डाणं रद्द करावी लागली आहे. गेल्या चार दिवसांपासून इंडिगो आणि स्पाईसजेटच्या चार फ्लाईट्स रद्द झाल्या आहेत.