बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) केल्या जाणाऱया अटकेच्या कारवाईवर ज्येष्ठ वकील प्रकाश आंबेडकर यांनी उच्च न्यायालयात तीव्र आक्षेप घेतला. यूएपीए कायद्याचा निव्वळ गैरवापर सुरू आहे. या कायद्याच्या माध्यमातून एनआयएसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा लोकांना ब्लॅकमेलिंग करताहेत, लोकांना संशयावरून उचलून तुरुंगात डांबले जातेय, असा युक्तिवाद अॅड. आंबेडकर यांनी केला.
यूएपीए कायद्याच्या संवैधानिक वैधतेला आव्हान देत अनिल बैले यांनी अॅड. संदेश मोरे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी याचिकाकर्त्यातर्फे युक्तिवाद पूर्ण केला. त्यानंतर न्यायालयाने पेंद्र सरकारची बाजू ऐकण्यासाठी 7 ऑगस्टला पुढील सुनावणी निश्चित केली आहे.