थालिपीठ, मसाले भात, मोदक… अशी होती अनंत अंबानीच्या लग्नात मराठमोळ्या पदार्थांची चंगळ

देशातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक असलेले मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या लग्नात देशविदेशातून मंडळी आली होती. गेले कित्येक महिन्यांपासून या लग्नाचे प्री वेडिंग फंक्शन सुरू होते. अखेर 12 जुलैला अनंत अंबानी व राधिका मर्चंट हे लग्नबंधनात अडकले.

अनंत व राधिकाच्या लग्नात जेवणाची अगदी चंगळच होती. देशविदेशातील मिळून तब्बल असे 2500 शाकाहारी पदार्थ या लग्नसोहळ्याला होते. त्यात वेगवेगळ्या राज्यांचे व तिथल्या पदार्थांचे वेगळे स्टॉल होते. यात मराठमोळ्या पदार्थांची देखील रेलचेल होती. महाराष्ट्राच्या स्टॉलवर राज्यातील पारंपारिक पदार्थ पाहुण्यांना चाखायला मिळाले.

महाराष्ट्राच्या स्टॉलवर मिरची शेंगदाण्याचा ठेचा, मिरची कैरी ठेचा, भरलेली वांगी, पुनेरी बटाटा, बटाट्याची भाजी, डाळिंबी उसळ, मसाले भात असे पदार्थ होते तर डेझर्टमध्ये महाराष्ट्रातला पारंपारिक पदार्थ मोदकाची चव पाहुण्यांना चाखायला मिळाली