Video चंद्रपूरमधील मुलींच्या शाळेत दारूच्या बाटल्यांचा खच, शाळा झाली जुगाऱ्यांचे केंद्र; पालकांचा संताप

चंद्रपूर जिल्ह्यातील धाबा गावातील जिल्हा परिषदेच्या मुलींची शाळा ही आता दारुड्यांच्या आणि जुगारांचा अड्डा बनली आहे. शाळा परिसरात दारूच्या रिकाम्या बाटलांचा सडा, ठिकठिकाणी शौच केलेलं, जिथं तिथं पान तंबाखूच्या पिचकाऱ्या मारलेल्या असे शाळा परिसराचे चित्र दिसत असून त्यावरून पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

शाळा सुरू व्हायच्या आधी आणि शाळा सुटल्यानंतर इथं जुगारी एकत्र येत दारूंच्या घोटासोबतच पत्त्यांची अदलाबदली करतात. या शाळेतील शिक्षक बाहेरगावावरून येतात. वेळेवर शिक्षक कधीच हजर होत नाही अशी संतापलेल्या पालकांनी एकत्र येत मुख्याध्यापकांना जाब विचारत तक्रार केली, ज्या शाळेला दैवत मानल्या जाते त्या शाळेची ही दयनीय अवस्था बघून या शाळेकडे जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली .