स्वयंपुनर्विकास करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना सरकारने चार टक्के व्याज परतावा द्यावा

प्रातिनिधिक

मुंबईत स्वयंपुनर्विकास योजना आली आहे पुनर्विकास करायला गृहनिर्माण संस्था स्वत:च्या स्वत: गेल्या तर त्यांना जिल्हा बँकेच्या माध्यमातून पैसे दिले जातात आज जवळपास 6 इमारती उभ्या राहिल्या असून 1600 प्रस्ताव आलेत. 4 टक्क्याचा व्याज परतावा त्या सोसायटीसाठी सरकारने द्यावा, अशा प्रकारची मागणी गृहनिर्माणच्या परिषदेत झाली. त्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी यांनी तत्वतŠ मान्यता दिली. ती मागणी सरकारने पूर्ण करावी अशी अपेक्षा विधान परिषदेतील भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्पीय चर्चेवरील भाषणात भाग घेताना दरेकर यांनी ही मागणी केली. यावेळी त्यांनी सहकार क्षेत्र आणि नागरी बँकांच्या विषयावर भाष्य केले.