विको कंपनीची रेवती, आलियाच्या साथीने दक्षिणेवर स्वारी

आयुर्वेदिक औषधे आणि सौंदर्य प्रसाधनांसाठी जगभरात ओळखली जाणारी विको लॅबोरेटरीज कंपनी आता दक्षिण हिंदुस्थानात वाटचाल करण्यासाठी सज्ज झाली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये विकोची उत्पादने पोहोचवण्यासाठी दाक्षिणात्य अभिनेत्री रेवती आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या नव्या जाहिरात मोहिमा राबवल्या जाणार आहेत.

विकोचे संचालक संजीव पेंढरकर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ते म्हणाले, दोन्ही अभिनेत्रींकडे समाजभान, अतुलनीय प्रतिभा आणि समाज मनाची पकड घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे आमच्या ब्रँडसाठी आम्ही त्यांची निवड केली आहे. नैसर्गिक सौंदर्य आणि निरोगी आरोग्याचा संदेश दक्षिणेकडे पोहोचवण्यासाठी त्यांची मदत आमच्यासाठी मोलाची ठरणार आहे. दरम्यान, या दोन्ही अभिनेत्री आपला वैयक्तिक अनुभवही जाहिराती आणि सोशल मीडियावर शेअर करणार आहेत. दक्षिणेकडील राज्यांमधील मोहिमेमुळे विको समूहाच्या कक्षा आणखी रुंदावणार आहेत.