नाशिकमध्ये मद्य तस्करांनी ‘उत्पादन शुल्क’ची स्कॉर्पिओ उडवली; चालक ठार, तीन जखमी

चांदवड तालुक्यातील हरनूल येथे सोमवारी पहाटे अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या गुजरातच्या क्रेटा कारचा उत्पादन शुल्क विभागाची वाहने पाठलाग करीत होती. दरम्यान, रेल्वे फाटकाजवळ क्रेटाने स्कॉर्पिओ उडवली. यात स्कॉर्पिओचा चालक कैलास कसबे (54) याचा मृत्यू झाला. तर लासलगाव पोलीस ठाण्यातील दोन कर्मचारी, उत्पादन शुल्कचे एक कर्मचारी जखमी आहेत.

लासलगाव-चांदवड रस्त्यावरून अवैध मद्य वाहतूक होणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार भरारी पथकाची वाहने संशयित गुजरात पासिंगच्या क्रेटा कारचा पाठलाग करीत होती. लासलगावजवळील रेल्वेच्या बंद फाटकाजवळ स्कॉर्पिओमधील अधिकारी आणि कॉन्स्टेबल विजेंद्र चव्हाण खाली उतरले. याची संधी साधून तस्करांनी जोरात धक्का दिल्याने स्कॉर्पिओ उलटली. यात आतील डोंगरे, निकम, उत्पादन शुल्कचे कॉन्स्टेबल राहुल पवार जखमी झाले. दरम्यान, व्रेटा कार शोधण्यासाठी जागोजागी नाकाबंदी करण्यात आल्याची माहिती चांदवड पोलिसांनी दिली.