एनडी स्टुडिओ पुन्हा गजबजला, ’फुलवंती’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनानंतर शांत झालेला कर्जतचा एनडी स्टुडिओ आता पुन्हा एकदा गजबजला आहे. एनडी स्टुडिओमध्ये सध्या स्नेहल तरडे दिग्दर्शित, प्राजक्ता माळीची मुख्य भूमिका असलेल्या ’फुलवंती’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. आपल्या भावना व्यक्त करताना स्नेहल तरडे म्हणाल्या, दिग्दर्शिका म्हणून माझ्या पदार्पणाचे काम मी एनडी स्टुडिओमध्ये सुरु केले आहे. नितीन देसाईंच्या जाण्यापूर्वी एक आठवडा आधी त्यांची आणि माझी भेट झाली होती. पण दुर्दैवाने आमची ती भेट पहिली आणि शेवटची ठरली. हा स्टुडिओ म्हणजे त्यांचं स्वप्न आहे. ‘फुलवंती’च्या निमित्ताने ते पुन्हा बहरतंय याचा जास्त आनंद वाटतोय.