ताडील सायटे येथे रस्त्यात दरड कोसळून पाण्याचा प्रवाह वाढला; कोंगळेकडील वाहतुक ठप्प

ताडील या गावाकडून कोंगळेकडे जाणा-या मार्गावर ताडील सायटे येथे 10 वर्षापूर्वी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून झालेल्या रस्त्यावर दरडीसह झाडे आडवी झाली त्यातच रस्त्यावरून पाण्याचाही प्रवाह सुरू झाला त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.

दापोली तालक्यातील ताडील या गावाकडून पुढे कोगळेे या गावाकडे जाणा-या मार्गाचा वाहतुकीसाठी उपयोग हा कोंगळे गावासाठी तर होतोच शिवाय ताडील या गावाचा वरचा तसेच खालील सायटा त्याचप्रमाणे वाघवे या गावाच्या चिखली या वाडीलाही होतो शिवाय या मार्गावरूनच पुढे राजापुर देहेणकडे जाणारा सोयीचा आणि जवळचा मार्ग आहे अशा या मार्गावर ताडील सायटे या ठिकाणी दरड कोसळून रस्ता वाहतुकीसाठी पुर्णतः बंद झाला आहे. रस्त्याची अवस्था पाहता पाण्याच्या प्रवाहाने रस्ता पार उखडून गेला आहे त्यामुळे कोंगळे, वाघवे चिखली, वरचा सायटा खालचा सायटा येथील लोकांना अन्य दुसरा दापोलीकडे येणारा मार्ग नसल्याने येथील लोकांची रस्त्या अभावी मोठीच गैरसोय होणार आहे. त्यात या मार्गावर कोंगळेकडे धावणा-या दिवसभरातील 4 एस.टी.बसच्या फे-या बंद ठेवण्याच्या नामुष्कीमुळे येथील रहीवाशांसह विदयार्थी वर्गाला याचा मोठाच फटका बसणार आहे.