चीनने पँगॉन्ग सरोवराजवळ खोदले बंकर, सॅटेलाइट फोटो उघड; मोदी सरकारला पत्ताच नाही

हिंदुस्थान आणि चीन यांच्यातील कळीचा मुद्दा असलेल्या पँगॉन्ग सरोवराच्या जवळ चीनने शस्त्रास्त्रs आणि इंधन साठवणुकीसाठी भूमिगत बंकर तयार केले आहेत. चिनी सैन्य पूर्व लडाखच्या या भागात मोठय़ा प्रमाणावर खोदकाम करत असल्याची उपग्रह छायाचित्रे उघड झाली आहेत. याच भागात वाहनांसाठी अभेद्य निवारेही उभारण्यात आले असून याबाबत मोदी सरकारला कोणताच पत्ता नाही.

ब्लॅकस्काय या अमेरिकेतील पंपनीने दिलेल्या छायाचित्रांनुसार, 2021-22 पासून चीनने या भागात खोदकाम करून भुयारी बंकर उभारले आहेत. सरोवराच्या उत्तरेकडे सिरजाप येथे येथील चिनी सैन्याचे मुख्यालय आहे. ते प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून सुमारे 5 किमी अंतरावर आहे.

आठ दरवाजे असलेला मोठा बंकर

मे 2020 मध्ये उभय देशांमध्ये नियंत्रण रेषेवर झालेल्या संघर्षानंतर चीनने येथील हालचाली वाढवल्या आहेत. तोपर्यंत या प्रदेशात मानवी वावर तुरळकच होता. पण ब्लॅकस्कायने उपलब्ध केलेल्या 30 मेच्या छायाचित्रांत, आठ प्रवेशमार्ग असलेला एक मोठा भूमिगत बंकर स्पष्टपणे दिसतो. तसेच या मोठय़ा बंकरजवळ पाच प्रवेशमार्गांचा एक लहान बंकरही दिसतो आहे. तसेच, मुख्यालयासाठी अनेक मोठय़ा इमारतींव्यतिरिक्त, तळावर वा परिसरातील तैनात असलेल्या चिलखती वाहनांसाठी अभेद्य निवारेही दिसतात. गायडेड मिसाइलच्या माऱयालाही तोंड देऊ शकतील असे हे निवारे आहेत.

तोफखान्यासाठीही सुविधा

छायाचित्रांतील तपशिलानुसार, या चिनी तळावर साठवण डेपोंसह तोफखाना आणि इतर संरक्षणात्मक चौक्यांचाही समावेश आहे. सार्वजनिक नकाशांवर न दाखवलेले रस्ते आणि खंदकांच्या विस्तृत नेटवर्पद्वारे हा तळ जोडण्यात आला आहे, असे ब्लॅकस्कायमधील एका विश्लेषकाने सांगितले.

गलवानपासून जवळच चिनी तळ

हा तळ जून 2020 मध्ये झालेल्या क्रूर चकमकीचे ठिकाण गलवान व्हॅलीच्या आग्नेयेस 120 किमीपेक्षा थोडा जास्त अंतरावर आहे. याच गलवान खोऱ्यात 20 भारतीय सैनिक आणि किमान चार चिनी सैनिकांचा मृत्यू झाला होता. भारतीय अधिकाऱयांनी यासंदर्भात अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, भारतानेही आपल्या सीमावर्ती भागात विविध रस्ते, पूल, बोगदे, एअरफील्ड आणि हेलिपॅड तयार केले आहेत, असे सूत्रांचे म्हणणे आहे.