वरळीत बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला उडवले; महिलेला सी-लिंकपर्यंत फरफटत नेले, मिंधे गटाच्या उपनेत्याचा मुलगा आरोपी

पुण्यातील पोर्शे कार अपघाताची घटना ताजी असतानाच रविवारी पहाटे वरळीत ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची भयंकर घटना घडली. भरधाव बीएमडब्ल्यूने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने महिलेचा मृत्यू, तर तिचा पती जखमी झाला. दारूच्या नशेत बेदरकार ड्रायव्हिंग करणारा मिहीर शहा हा मिंधे गटाचा पालघरचा उपनेता राजेश शहा याचा मुलगा आहे. त्याने गाडीखाली चिरडलेल्या महिलेला ‘सी लिंक’पर्यंत फरफटत नेले. अपघातानंतर तो पसार झाला असून पोलिसांनी राजेश शहा व कारच्या पुढील सीटवर बसलेल्या राजýषी बिडवतला रात्री उशिरा अटक केली.

वरळीच्या सीजे हाऊस परिसरात पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात घडला. कोळीवाडा येथे राहणाऱया प्रदीप नाखवा यांचा मासेविक्रीचा व्यवसाय आहे. पावसाळय़ात मासेमारी बंद असल्याने ते पत्नी कावेरीला सोबत घेऊन दुचाकीवरून मनीष मार्पेटला गेले होते. तेथून मासे घेऊन घरी परतत होते. यादरम्यान गोरेगावच्या दिशेने चाललेल्या भरधाव बीएमडब्ल्यूने प्रदीप यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात प्रदीप व कावेरी कारच्या बोनेटवर पडले. यावेळी प्रदीप यांनी कार थांबवण्यास सांगितले. मात्र दारूच्या नशेत असलेल्या मिहीरने जोराचा ब्रेक मारल्याने दोघे खाली पडले. प्रदीप बाजूला फेकले गेले, तर कावेरी कारच्या चाकाखाली चिरडल्या. भयंकर म्हणजे, रक्तबंबाळ अवस्थेतील कावेरी यांना कारने वांद्रे-वरळी सी लिंकपर्यंत फरफटत नेले. प्रदीप कारच्या मागे धावत गेले. काही अंतरावरून त्यांनी टॅक्सीची मदत घेऊन पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. दीड किलोमीटर अंतर टॅक्सीने प्रवास केल्यानंतरही कावेरी दिसून न आल्यामुळे त्यांनी मदतीसाठी पोलिसांना पह्न केला. त्यानंतर वरळी पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी कावेरीचा शोध घेऊन तिला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी प्रदीप यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद केला. सायंकाळी फॉरेन्सिक लॅबचे पथक वरळी पोलीस ठाण्यात दाखल झाले. या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.

माझी बायको परत येणार का? प्रदीप यांचा आक्रोश

‘ड्रंक अँड ड्राईव्ह’मध्ये प्राण गमावलेल्या कावेरी यांचे पती प्रदीप नाखवा यांनी अपघातानंतर आक्रोश केला. पोलीस आरोपीला कठोर शिक्षा देणार असल्याचे सांगताहेत. पण यामुळे माझी बायको परत येणार का? कारने माझ्या पत्नीला सी लिंकपर्यंत फरफटत नेले. तिच्या अंगावर एकही कपडा उरला नव्हता. दोन मुलांना टापून माझी पत्नी गेली. आम्ही मासे विपून आमचा उदरनिर्वाह चालवतो. पत्नी गेली, आता आम्ही कसे जगायचे? धडक देणाऱया गाडीवर पक्षाचे चिन्ह होते, जे त्यांनी खोडले. त्यांचे प्रवक्ते येऊन भाषणे देतील. पण त्यांच्या घरातील पुणी गेले तर त्यांना कळेल, असा टाहो प्रदीप नाखवा यांनी फोडला.

मिहीर शहा पसार; फोनही ठेवला बंद

कावेरी यांना सी लिंकपर्यंत फरफटत नेत मिहीर शहा सी लिंकमार्गेच पळून गेला. अपघातानंतर त्याने पह्न बंद करून ठेवला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी चार पथके तयार केली असून त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांचे एक पथक दुपारी सीजे हाऊस येथे गेले होते, तर दुसरे पथक सीजे हाऊस ते वरळी सी लिंकपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज तपासत होते. अपघातानंतर मिहीरला त्याच्या गर्लफ्रेंडने लपवण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. या अनुषंगाने अधिक तपासासाठी पोलिसांनी मिहीरच्या गर्लफ्रेंडलासुद्धा ताब्यात घेतले आहे.

मिंधे गटाचे चिन्ह पुसण्याचा प्रयत्न

मिहीर शहाच्या कारवर मिंधे गटाचे चिन्ह होते. अपघातानंतर लगेचच ते चिन्ह पुसण्याचा प्रयत्न केला गेला. तसेच मागील नंबर प्लेट काढून ती गाडीत ठेवण्यात आली. दुपारी प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) अधिकारी पोलीस ठाण्यात आले. अधिकाऱयांनी अपघाताला कारणीभूत कारची तपासणी केली असून त्याचा अहवाल पोलिसांना दिला जाणार आहे.

जुहूतील बारमध्ये केली दारूची पार्टी

मिहीर हा शनिवारी रात्री जुहूतील एका बारमध्ये चार मित्रांसोबत गेला होता. त्याने तेथे दारूची पार्टी केली. बारमधील 18 हजार रुपयाचे बिल मिहीरच्या मित्राने दिले होते. याची माहिती समजताच वरळी पोलीस जुहू येथील बारमध्ये गेले. तेथे मॅनेजरची चौकशी करण्यात आली असून बारमधील सीसीटीव्ही आणि डीव्हीआर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

जुहूतील बारमध्ये केली दारूची पार्टी

मिहीरने शनिवारी रात्री जुहूतील बारमध्ये चार मित्रांसोबत दारूची पार्टी केली होती. ही माहिती समोर येताच पोलिसांनी बारच्या मॅनेजरची चौकशी केली असून बारमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे.