Assam Floods : 24 लाखांहून अधिक नागरिकांना फटका, काझीरंगा अभयारण्यात 77 हून अधिक प्राण्यांचा मृत्यू

आसाममध्ये पावसाने हाहाःकार माजवला आहे. पावसामुळे सर्व प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने राज्यातील पूरस्थिती अधिक गंभीर बनली आहे. सुमारे 30 जिल्ह्यांना या पूराने वेढले आहे. 24 लाखांहून अधिक नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.

केवळ नागरिकच नाही तर वन्य प्राण्यांचेही मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. काझीरंगा अभयारण्यात 77 हून अधिक वन्यप्राण्यांना मुकावे लागले आहे.

काझीरंगाचा जवळपास 70 टक्के भाग पाण्याखाली आहे. यामुळे उद्यानातील वन्य जीवांचे हाल झाले आहेत. तीन गेंडे आणि 62 हॉग डियरसह 77 हून अधिक प्राण्यांचा पूराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला.