![kolhapur nala](https://www.saamana.com/wp-content/uploads/2024/07/kolhapur-nala-696x447.jpg)
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र दमदार पाऊस होऊ लागल्याने नद्या-नाले प्रवाहित झाले आहेत. या प्रवाहाबरोबरच शहर व ग्रामीण परिसरातील सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळत असल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या जयंती (नदी) नाल्याचे फेसाळलेले सांडपाणी पुन्हा थेट पंचगंगा नदीत मिसळताना दिसून आले. त्यामुळे पंचगंगा नदीतील प्रदूषण रोखण्यासंदर्भात प्रशासन आणि सरकारकडून बैठकांचा नुसताच फार्स सुरू असल्याचे दिसून येऊ लागले आहे.