माझ्या बॅगेत बॉम्ब आहे, प्रवाशांने सांगितल्यावर कर्मचारी अलर्ट, अफवा की धमकी…शोध सुरू

एअर इंडिया एक्स्प्रेसच्या फ्लाईटमध्ये एका प्रवाशाने तपासा दरम्यान त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याचे सांगितले आणि सहप्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.

ट्रान्झिट चेकिंग दरम्यान , ट्रान्झिट चेकिंग दरम्यान प्रवाशाने त्याच्या बॅगेत बॉम्ब असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांना दिली होती. एअरलाइन्स स्टाफने तत्काळ बॉम्ब थ्रेट असेसमेण्ट कमिटी ला याबाबत माहिती दिली आणि बॉम्ब शोधक पथकाने त्या प्रवाशाची बॅग तपासली. मात्र त्या प्रवाशाच्या बॅगेत बॉम्ब होता की नाही याबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही. मात्र बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमानतळ प्रशासनाने या प्रकरणावर नियमानुसार तातडीने कारवाई करत एसओपीनुसार बॅगा आणि प्रवाशांची तपासणी केली.

 याआधीही अनेक प्रवाशांनी उड्डाण आणि तपासणीदरम्यान अशा धमक्या दिल्या आहेत, मात्र तपासणीदरम्यान त्यांच्या बॅगमध्ये काहीही आढळून आले नाही.