संसदेत शपथ घेतल्यानंतर जय संविधान म्हणणे गुन्हा आहे का? आदित्य ठाकरे यांचा एनडीए सरकारला परखड सवाल

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज संसद सदस्यत्वाची शपथ घेतली. शपथेशेवटी त्यांनी जय हिन्द! जय संविधान असा नारा दिला. त्यानंतर एनडीए सरकारमधील खासदारांनी गदारोळ केला. यावरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एनडीए सरकारला संसदेत शपथ घेतल्यानंतर जय संविधान म्हणणे गुन्हा आहे का, असा परखड सवाल केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्सवरून एनडीए सरकारवर निशाणा साधला. आम्ही जे आजवर म्हणत आलो आहोत ते पुन्हा म्हणतो, भाजपला आपली राज्यघटना बदलायची आहे, असा सणसणीत आरोपही आदित्य ठाकरे यांनी केला. जय हिन्द! जय संविधान! म्हटल्यावर घृणास्पद प्रतिक्रिया देण्याची गरजच काय? जय संविधान हा भारतातील लोकांचा आवाज आहे म्हणून की ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले आहे म्हणून, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.