इस्रोची कमाल, पुष्पकचे तिसऱयांदा यशस्वी लॅण्डिंग

इस्रोने अंतराळ क्षेत्रात आणखी एक मोठी भरारी घेतली आहे. इस्रोच्या रियूजेबल लॉन्च व्हेईकल-एलईएक्स-03 पुष्पकने सलग तिसऱयांदा यशस्वी लॅण्डिंग केली आहे. या यशस्वी कामगिरीमुळे इस्रोसाठी पुष्पकचा ऑर्बिटल री-एंट्री टेस्ट करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही चाचणी बंगळुरूपासून जवळपास 220 किलोमीटर दूर चित्रदुर्ग जिह्याच्या चल्लेकेरे येथील एरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये आयोजित करण्यात आली होती.

पुष्पक विमानाची चाचणी आज सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी बंगळुरूपासून 220 किमी अंतरावर असलेल्या एरोनॉटिकल टेस्ट रेंजमध्ये करण्यात आली. पुष्पक विमान हिंदुस्थानी हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून साडेचार किलोमीटर उंचीवर नेण्यात आले. त्यानंतर ते धावपट्टीवर ऑटोनॉमस लॅण्डिंगसाठी सोडण्यात आले. याआधी इस्रोने जेव्हा लॅण्डिंगची चाचणी केली होती तेव्हा पुष्पक विमान दीडशे मीटरच्या क्रॉस रेंजवरून सोडण्यात आले होते.