शेख हसिना हिंदुस्थान दौऱयावर
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना या हिंदुस्थान दौऱयावर आल्या आहेत. हसिना यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन विविध मुद्दय़ांवर चर्चा केली. हिंदुस्थान-बांगलादेश या दोन देशांमधील संबंधाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येईल, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. या दोन देशांमधील हरीत भागीदारीसाठी एका करारावर दोन्ही नेत्यांनी स्वाक्षऱया केल्या. यावेळी समुद्री सहकार्य समझोता झाला.
टोमॅटो 100 रुपये किलो
कांदा, बटाटय़ाचे भाव वाढल्यानंतर आता टोमॅटोचे भाव दुप्पट-तिप्पट वाढले आहेत. 40 ते 50 रुपये किलो मिळणाऱया टोमॅटोने आता भावामध्ये शंभरी गाठली आहे. मुंबईत किरकोळ बाजारात टोमॅटो 80 ते 100 रुपये किलो भावाने विकले जात आहेत. टोमॅटोचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. उष्णतेची लाट आणि टोमॅटोचे घटलेले उत्पादन यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ होत असे व्यापाऱयांकडून सांगितले जात आहे.
टाटा स्टीलमध्ये संपाची हाक
ब्रिटनमधील टाटा स्टीलचे सुमारे दीड हजार कर्मचारी 8 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. हा संप वेल्समधील पोर्ट टॅलबोट आणि लनवर्नमधील पंपनीतील 2 हजार 800 कर्मचाऱयांना कामावरून कमी करणे आणि स्पह्ट भट्टी बंद करण्याच्या विरोधात करण्यात येणार आहे. कर्मचारी युनियनने या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच कामाचे नियम आणि ओव्हरटाइम निर्बंध सुरू केले आहेत, असे युनियनने निवेदनात म्हटले आहे.
ताजिकिस्तानमध्ये हिजाबवर बंदी
मुस्लिमबहुल देश ताजिकिस्तानने हिजाब वापरण्यावर बंदी घातली आहे. राष्ट्राध्यक्ष इमोमाली रहमान यांनी हिजाबला ‘विदेशी वस्त्र’ म्हणत या बंदीची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयावर देशभरातून टीका होत आहे.
जस्टिन ट्रुडो यांना कोर्टाचा झटका
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना पॅनडा कोर्टाने जोरदार झटका देत खलिस्तान समर्थकांना विमान प्रवासावरील बंदी योग्य ठरवली आहे. निज्जरच्या दोन साथीदारांना विमानात चढू न देण्याचा निर्णय योग्य होता, असे कोर्टाने नमूद केले आहे.
13 हजार 800 श्रीमंतांचा रामराम
चीन सध्या आर्थिक अडचणीच्या कात्रीत सापडला आहे. त्यामुळे चीनमधील अनेक श्रीमंत व्यक्ती देश सोडून अन्य ठिकाणी जात आहेत. 2023 मध्ये चीनमधील 13 हजार 800 श्रीमंत व्यक्तींनी चीनला राम राम ठोकला आहे.
31 जुलैपर्यंत आयटीआर भरा
इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) भरण्याची शेवटची मुदत 31 जुलै 2024 पर्यंत आहे. त्यामुळे आयकर विभागाने करदात्यांना कोणताही विलंब न करता लवकरात लवकर रिटर्न फाईल करण्यास सांगितले आहे.
कैद्याला परीक्षेला बसण्याची परवानगी
मध्य प्रदेशमध्ये 64 कोटी रुपयांचा ड्रेनेज घोटाळ्यातील आरोपी सहायक लेखा परीक्षक (ऑडिटर) या पैद्याला परीक्षेत बसू देण्याची परवानगी मध्य प्रदेश हायकोर्टाने दिली. मध्य प्रदेश लोक सेवा आयोग ही परीक्षा उद्या, रविवारी होत आहे.
अंतराळवीरांचा प्रवास लांबला
अंतराळवीरांना नेणाऱया बोईंग स्टारलायनरचा परतीचा प्रवास स्थगित करण्यात आला. नासाने या बोईंगच्या परतण्याची अद्याप नवी तारीख जाहीर केली नाही. त्यामुळे अंतराळवीरांच्या परतीच्या प्रवासावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.