विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कोर्टाचा दणका, 3 हजारांचा दंड बजावला

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुंबईतील सेशन कोर्टाने दणका दिला आहे. सुनावणीला सातत्याने गैरहजर असल्यामुळे कोर्टाने राहुल नार्वेकर यांना 3 हजार रुपयांचा दंड बजावला आहे. यामुळे विधानसभा अध्यक्ष असलेल्या राहुल नार्वेकर यांची मोठी नाचक्की झाली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोना संसर्गात भाजपने वीज दरवाढीविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान बेस्टच्या महाव्यवस्थापकांना मारहाण करण्यात आली होती. या मारहाणप्रकरणी भाजपच्या 20 पदाधिकाऱ्यांवर मुंबईतील सेशन कोर्टात खटला सुरू आहे. या खटल्यात 20 पदाधिकाऱ्यांमध्ये राहुल नार्वेकर यांचेही नाव आहे.

सुनावणीदरम्यान राहुल नार्वेकर सतत गैरहजर राहिले. त्यामुळे कोर्टाने राहुल नार्वेकर यांना 3 हजार रुपयांचा दंड बजावला. या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 8 जुलैला होणार आहे. पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेश, कोर्टाने जारी केले आहेत.