रहिवाशांच्या तक्रारी, समस्या ऐकून घेण्यासाठी म्हाडातर्फे प्रत्येक महिन्याच्या दुसऱया सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. परंतु लोकसभा निवडणुकीपाठोपाठ राज्यात आता दोन शिक्षक व दोन पदवीधर अशा एकूण चार विधान परिषद मतदारसंघांतील निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतरच म्हाडा लोकशाही दिनाचे आयोजन करणार असून पुढील लोकशाही दिन 8 जुलै रोजी आयोजित करण्याचे प्रस्तावित आहे, असे म्हाडातर्फे सांगण्यात आले आहे.
‘म्हाडा’च्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील चौथ्या मजल्यावर असलेल्या सभागृहात ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी 2024 पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱया सोमवारी म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. आतापर्यंत म्हाडामध्ये तीन लोकशाही दिन घेण्यात आले असून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.