यावर्षी हज यात्रेत मृत्युमुखी पडलेल्या एक हजारांहून अधिक मृतांमध्ये 98 हिंदुस्थानी नागरिकांचा समावेश आहे. हे मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.
सध्या सौदीमध्ये प्रचंड उष्मा आहे. अक्षरशः भाजून काढणाऱया उन्हाचा अनुभव तेथील लोक घेत आहेत. या आठवडय़ात सौदीचे तापमान 51.8 डिग्री सेल्सिअस होते. उष्माघातामुळे 1081 लोकांचा मृत्यू झाल्याचे समजते.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दरवर्षी अनेक हिंदुस्थानी हज यात्रेला जातात. यावर्षी आतापर्यंत एक लाख 75 हजार हिंदुस्थानी यात्रेकरू हजला गेले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज एक निवेदन जारी केले. त्यामध्ये आरोग्य सेवांचा आराखडा आणि हज यात्रेकरूंनी या सेवेचा लाभ घेण्याच्या पद्धतींची माहिती दिली आहे. यात्रकरूंचे आरोग्य आणि फिटनेस प्रमाणपत्र, आरोग्य कार्ड, लसीकरण शिबीर आदींसाठी आरोग्य डेस्क उभारणे अशा उपाययोजना आहेत.