दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठ विधान केलं आहे. त्यांनी आपल्या X हॅण्डल वरून एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी ‘अधम मार्गाने एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही’, अशी भावना पक्की झाल्याचं म्हटलं आहे.
आपल्या संपूर्ण पोस्ट मध्ये ते म्हणतात, ‘दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून एक गोष्ट स्पष्ट झाली. देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. अधम मार्गाने एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणाऱ्या देशात कधीच यशस्वी होणार नाही, अशी भावना केजरीवाल यांना मिळालेल्या जामीनातून पक्की झाली’.
https://x.com/PawarSpeaks/status/1803817786067612035?t=s26boM9QhNfKISUOhSZlMA&s=19