उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मराठा समाजाने विश्वास ठेवला होता. परंतु त्यांनी आमचा विश्वास गमावला आहे. देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन म्हणजे पेंद्या-सुदामाची जोडी असल्याची कडक टीका मनोज जरांगे- पाटील यांनी केली.
हैदराबाद गॅझेट तसेच सगेसोयऱयांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्याचा शब्द सरकारने दिला आहे. मराठा समाजाची पुन्हा फसवणूक करू नका ते महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.
वडेट्टीवार तेव्हा रडले नाहीत
उपोषणाला बसलेल्या ओबीसी नेत्यांना पाहून विजय वडेट्टीवार रडले. मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांनी आपले प्राण दिले. त्यांच्या कुटुंबाचे अश्रू पुसण्यासाठी वडेट्टीवारांना कधी वेळ मिळाला नाही. असा ढोंगी नेता महाराष्ट्राने कधी पाहिला नाही, असा हल्लाबोल मनोज जरांगे यांनी केला.