पोलीस कवायत मैदानावर बुधवारपासून पोलीस भरतीला प्रारंभ झाला.पावसाच्या सावटाखाली ही पोलीस भरती सुरू झाली. बुधवारी पहिल्या दिवशी भरतीसाठी 300 उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते.त्यापैकी 162 उमेदवार हजर होते. आज झालेल्या चाचणीमध्ये 135 उमेदवार प्राप्त झाले तर 27 उमेदवार अपात्र झाले.
रत्नागिरीत 170 जागांसाठी पोलीस भरती घेण्यात येत आहेत. 170 जागांसाठी 8713 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. 170 पदांपैकी 149 पदे पोलीस शिपाई आणि 21 पदे चालकांची आहेत.पोलीस पहिल्या दिवशीच पावसाने हजेरी लावली तरी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. आज पहिल्या दिवशी 300 उमेदवारांना पाचारण करण्यात आले होते. त्यापेकी 162 उमेदवार उपस्थित होते. 138 उमेदवार गैरहजर होते. 162 पैकी 135 उमेदवार पात्र झाले. 27 उमेदवार अपात्र झाले.