महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव झाला आहे. निवडणुकी आधी 45 जागा मिळतील असा दावा फडणवीस यांनी केला होता मात्र प्रत्यक्षात महायुती ला 20 जागा देखील मिळवता आल्या नाहीत. त्या पराभवाची जबाबदारी घेत फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायची इच्छा व्यक्त केली होती. त्यांनी या पदातून मला मुक्त करण्याची मागणी केली होती मात्र अद्याप त्यांच्या या मागणीबाबत निर्णय झाला नव्हता.
या पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्लीत भाजप च्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत फडणवीस यांच्या बाबत निर्णय घेतला जाणार अशी चर्चा होती. या बैठकी नंतर फडणवीस अणि पियुष गोयल यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. या वेळी पत्रकारांनी फडणवीस यांच्याबाबतीत काय निर्णय झाला त्या विषयी विचारले. त्यावर बोलताना गोयल म्हणाले, राज्याच्या भाजपमध्ये कुठलाही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.” त्यामुळे फडणवीस यांची मागणी पक्ष श्रेष्ठींनी मान्य केली नसल्याचे समजते.