देवगड येथील सांस्कृतिक भवन येथे रविवारी शिवसेना आणि इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची आभार मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन कार्यक्रमात शिवसेना नेते खासदार विनायक राऊत केले. आपल्याला मतदान केलेल्या मतदारांचे त्यांनी प्रथमतः आभार मानले.
यावेळी “एकही रुपया न देता 4 लाखापेक्षा जास्त मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखविला आहे. त्या मतदारांशी आणि लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना, इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्यांच्या पाठीशी ठाम राहणे ही माझी जबाबदारी आहे. मी निवडणुकीत विजयी झालो नाही म्हणून पळून जाणारा नाही. आता खासदार नसलो तरी देखील त्याच आपुलकीने आपल्या सुखदुःखात सामील होणार आहे. देवगड मतदारसंघासहित संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा नेता म्हणून मातोश्रीचा सच्चा शिलेदार म्हणून यापुढे तसाच कार्यरत राहणार आहे.पदाधिकारी कार्यकर्ते यांनी आताच्या पराभवाला खचून न जाता उद्याच्या विजयाकडे झेपावण्याची ताकद ठेवा. येणाऱ्या निवडणूकित आपल्याला विजय मिळविल्याशिवाय शांत बसायचे नाही असे आवाहन शिवसेना नेते खासदार विनायक राऊत यांनी केले.
रिफायनरी प्रकल्प करून गिर्ये, रामेश्वर, राजापूर उध्वस्त करायचे कपट कारस्थान आखात असाल तर आम्ही देखील मेलेल्या आईचे दूध प्यालेलो नाही कोकणवासीय म्हणून आम्ही तुम्हाला पुरून उरू असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी मार्गदर्शन मेळाव्यात दिला. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख उपनेते अरुण दुधवडकर,जिल्हाप्रमुख संदेश पारकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इशाद शेख, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव, शरद शिंदे युवा सेना तालुकाप्रमुख फरित काझी, काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर,काँग्रेस तालुकाध्यक्ष उमेश कुळकर्णी, माजी सभापती रवींद्र जोगल,माजी तालुकाप्रमुख प्रसाद करंदीकर,शेखर धुरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.