इस्रायल-हमासमधील युद्ध नऊ महिन्यांपासून सुरू असतानाच आज लेबनॉनमधील दहशतवादी संघटना ‘हिजबुल्लाह’ने इस्रायलवर मोठा हल्ला केला. ‘हिजबुल्लाह’ने इस्रायलवर किमान 400 क्षेपणास्त्र्ाs आणि ड्रोनचा मारा केला. यामुळे इस्रायली सैन्याचे अनेक तळ उद्ध्वस्त झाले असून मध्य-पूर्व आशियात तणाव वाढला आहे. यामुळे युद्धाचा आणखी भडका उडण्याची भीती व्यक्त होत आहे.
इस्रायलने मंगळवारी हिजबुल्लाहच्या तळांवर हवाई हल्ले केले. त्यात हिजबुल्लाहाचा कमांडर अबू ताबेब ठार झाला. याला प्रत्युत्तर देताना हिजबुल्लाहने गुरुवारी इस्रायलवर मोठा हवाई हल्ला केला.
किमान 15 सैनिकी तळ उद्ध्वस्त
– ‘रॉयटर्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘हिजबुल्लाह’च्या दहशतवाद्यांनी गुरुवारी लेबनॉनच्या दक्षिण भागातून 400वर क्षेपणास्त्र्ाs, रॉकेट्स, ड्रोनने इस्त्र्ाायच्या तळांना टार्गेट केले. यात इस्त्र्ाायली सैन्याचे किमान 15 तळ उद्ध्वस्त झाले. या हल्ल्यात काही इस्त्र्ाायली नागरिक जखमी झाल्याचे वृत्त आहेत.
– ‘आमच्यावरील हल्ल्याचा बदला घेण्यासाठी आम्ही इस्रायलवर क्षेपणास्त्र्ाs डागली,’ अशी कबुली हिजबुल्लाहने दिली आहे.
मध्य-पूर्वेमध्ये चिंता वाढली
– इस्रायल-हमास यांच्यात 7 ऑक्टोबर 2023पासून युद्ध सुरू आहे. नऊ महिने झाले, तरी युद्ध थांबलेले नाही. त्यातच आज ‘हिजबुल्लाह’च्या दहशतवाद्यांनी इस्रायलला टार्गेट केल्याने मध्य-पूर्व आशियातील चिंता वाढली आहे. n युद्ध आणखी भडकले तर मध्य-पूर्वेमध्ये गुंता वाढू शकतो.
रशिया, उत्तर कोरियापर्यंत नेटवर्क असलेली दहशतवादी संघटना
‘हिजबुल्लाह’ची स्थापना 1985मध्ये लेबनॉनमध्ये बैरुत येथे झाली. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्लाह खोमेनी यांनीच ‘हिजबुल्लाह’ची कल्पना मांडली होती. अमेरिका आणि इस्रायलला विरोध हे या दहशतवादी संघटनेचे मुख्य लक्ष्य आहे. हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांचे जाळे केवळ लेबनॉन, इराणच नाही, तर सीरिया, रशिया आणि उत्तर कोरियापर्यंत पसरले आहे. अनेक युरोपीय देशांतील दहशतवादी हल्ल्यांमागे हिजबुल्लाहचा हात आहे.