T20 World Cup 2024 : टीम इंडिया सुपर-8 मध्ये, पण दोन खेळाडू अर्ध्यातूनच मायदेशी परतणार

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने सुपर-8 मध्ये धडाक्यात प्रवेश केला आहे. साखळी फेरीतील टीम इंडियाचा अखेरचा सामना कॅनेडाविरुद्ध होणार आहे. पंरतू या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे दोन खेळाडू मायदेशी परत असल्याची माहिती समोर आली आहे.

रोहित शर्माच्या शिलेदारांनी टी20 वर्ल्ड कपमध्ये जबरदस्त प्रदर्शन करत साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात आयर्लंड, दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि तिसऱ्या सामन्यात अमेरिकेचा पराभव करत टीम इंडिया ग्रुप ए मध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. तसेच ग्रुप ए मधून क्वालिफाय होणारा टीम इंडिया पहिला संघ ठरला आहे. इंडियाचा साखळी फेरीतील अखेरचा सामना 15 जून रोजी कॅनडाविरुद्ध होणार आहे. त्यानंतर सुपर-8 मध्ये इंडियाचा सामना 24 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. तत्पुर्वी टीम इंडियाचे राखीव खेळाडू शुभमन गिल आणि आवेश खान हिंदुस्थानात परतणार असल्याचे वृत्त आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शुभमन गिल आणि आवेश खान यांचा व्हिसा अमेरकापुर्ता मर्यादित होता. टीम इंडियाचे पहिले तिन्ही सामने अमेरिकामध्ये झाला आहे. मात्र आता टीम इंडियाचे पुढील सामने वेस्ट इंडिजमध्ये होणार आहेत. व्हिसा नसल्याच्या कारणामुळे शुभमन गिल आणि आवेश खान हे हिंदुस्थानात परतण्याची शक्यता आहे.