धक्कादायक ! तमिळ अभिनेता प्रदीप के विजयन राहत्या घरी मृतावस्थेत सापडला

सिनेक्षेत्रातून एक वाईट बातमी समोर आली आहे. तमिळ अभिनेता प्रदीप के विजयन राहत्या घरी मृतावस्थेत सापडला आहेत. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिसांकडून त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत तपास सुरु आहे. दरम्यान त्याच्या निधनाने सिनेक्षेत्रात खळबळ उडाली आहे.

तमिळ अभिनेता प्रदीप के.विजयन 12 जून रोजी पलवक्कम येथील त्याच्या राहत्या घरी मृतावस्थेत सापडला.त्याचे मित्र मागच्या दोन दिवसांपासून त्यांना फोन करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याच्याशी संपर्क होत नव्हता. दोन दिवस फोन करुनही तो फोन उचलत नसल्याने मित्रांना संशय आला आणि त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीसांना प्रदीप मृतावस्थेत सापडला. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याबाबत तपास केला जात आहे.

‘थेगिडी’ ,‘हे! सिनामिका’ सारख्या अनेक सिनेमांमध्ये खलनायक आणि विनोदी अभिनेता म्हणून काम केले आहे.