शालेय पोषण आहारात आता व्हेजिटेबल पुलावसह अंडा पुलाव आणि खीरही

शालेय पोषण आहारात आता व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव आणि खीर यांच्यासह विविध 15 पाककृतींचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱया शालेय पोषण आहार योजनेत या नवीन पाककृतीची अंमलबजावणी 2024-25 या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे. नवीन पाककृतीत प्रामुख्याने खिचडी, व्हेजिटेबल पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलावासह अंडा पुलाव आणि खीर आदींचा समावेश आहे. शाळांतील विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविला जातो. त्यात आता वैविध्यता आणली जाणार असून तीन संरचित आहार विद्यार्थ्यांना या निमित्ताने पुरविला जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाचे म्हणणे आहे.