पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि त्यांचे समर्थक कायम परिवारवादाचा मुद्दा उपस्थित करून विरोधकांना लक्ष्य करत असतात. पण Party with Difference असं म्हणत स्वत:ची पाठ थोपटवणाऱ्या भाजप आणि NDA ला झोंबणारी पोस्ट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी टाकली आहे. मोदी आणि भाजप समर्थकांचा यामुळे तिळपापड होत आहे.
राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत X हँडलवरून एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये NDA सरकारमध्ये मंत्रिमंडळात ज्यांना स्थान मिळालं आहे त्यांची राजकीय पार्श्वभूमी त्यांनी समोर मांडली आहे. NDA चं मंत्रिमंडळ नाही तर परिवार मंडळ असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
आपल्या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी म्हटलं आहे की, ‘पिढ्यांपिढ्या संघर्ष, सेवा आणि बलिदानाच्या परंपरेला घराणेशाही म्हणणारे आपल्या ‘सरकारी घराण्याला’ सत्तेचा वारसा वाटून देत आहेत. शब्द आणि कृतीतील फरक याला नरेंद्र मोदी म्हणतात!’.
या पुढे त्यांनी मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची राजकीय पार्श्वभूमी मांडणारी इमेज पोस्ट केली आहे.
पीढ़ियों के संघर्ष, सेवा और बलिदान की परंपरा को परिवारवाद कहने वाले अपने ‘सरकारी परिवार’ को सत्ता की वसीयत बांट रहे।
कथनी और करनी के इसी फर्क को नरेंद्र मोदी कहते हैं! pic.twitter.com/eAlfemxAJk
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 11, 2024
अशी आहे यादी:
एचडी कुमारस्वामी (माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे पुत्र)
ज्योतिरादित्य सिंधिया (माजी केंद्रीय मंत्री माधवराव सिंधिया यांचे पुत्र)
किरेन रिजिजू (अरुणाचलचे पहिले स्पिकर रिनचिन खारू यांचे पुत्र)
रक्षा खडसे (माजी मंत्री एकनाथ खडसे यांची सून)
जयंत चौधरी (माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग यांचे नातू)
चिराग पासवान (माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र)
जेपी नड्डा (माजी मंत्री, खासदार, जयश्री बॅनर्जी यांचे जावई)
कमलेश पासवान (लोकसभेचे उमेदवार ओम प्रकाश पासवान यांचे मित्र)
रामनाथ ठाकूर (बिहारचे माजी मुख्यमंत्री, कपूरी ठाकूर यांचे पुत्र)
राममोहन नायडू (माजी केंद्रीय मंत्री येरेन नायडू यांचे पुत्र)
जितीन प्रसाद (माजी खासदार जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र)
शंतनू ठाकूर (पश्चिम बंगालचे माजी मंत्री मंजूल कृष्णा ठाकूर)
राव इंद्रजित सिंग (हरियाणाचे माजी मुख्यमंत्री राव बिरेंद्र सिंग यांचे पुत्र)
पियुष गोयल (माजी केंद्रीय मंत्री वेद प्रकाश गोयल यांचे पुत्र)
कीर्ति वर्धन सिंह (उत्तर प्रदेशचे माजी मंत्री महाराज आनंद सिंह यांचे पुत्र)
विरेंद्र कुमार खाटिक (मध्य प्रदेशचे माजी मंत्री गौरीशंकर शेजवार यांचे मेहुणे)
रवनीत सिंग बिट्टू (पंजाबचे माजी मुख्यमंत्री, बेंत सिंग यांचे नातू)
धमेंद्र प्रधान (माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रधान यांचे पुत्र)
अनुप्रिया पटेल (बहुजन समाज पार्टी आणि अपना दलचे संस्थापक सोनेलाल पटेल यांची मुलगी)
अन्नपूर्ण देवी (बिहारचे माजी आमदार रमेश प्रसाद यादव यांच्या पत्नी)