राज्य सरकारने वक्फ मंडळाचे बळकटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 10 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली त्यापैकी 2 कोटी रुपयांचे सोमवारी वितरण करण्यात आले आहे
केंद्रात काँग्रेसचे सरकार असताना वर्ष 2007 मध्ये वक्फ भूमीसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्यात आली होती. जून 2007 मध्ये या समितीचे सदस्य महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे कामकाज तसेच वक्फ मंडळाची मालमत्ता यांची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्रात आले होते. या वेळी महाराष्ट्रातील काँग्रेस सरकारने वक्फ मंडळाला अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते.
दरम्यान, सकल हिंदू समाजाच्या वतीने जानेवारीमध्ये सोलापूर येथे हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये भाजप आमदार नितेश राणे यांनी Eिहंदूच्या जमिनीवर अतिक्रमण करणारा वक्फ बोर्ड कायदा रद्द करा अशी मागणी केली होती. आता महायुती सरकारने या मंडळासाठी दहा कोटी रुपयांची तरतूद केल्याने त्याचे अनेक अर्थ काढले जात आहेत.