जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर आज 10 जून रोजी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव येथील तीन नागरिकांनी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. अंबड तालुक्यातील साष्ट पिंपळगाव या गावातील गावात 32 जणांना घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे.
मागच्या 4 वर्षांपासून शरद सकट आणि भाऊसाहेब मोटे, लक्ष्यण सकट यांची घरकुलाच्या पात्र लाभार्थ्यांच्या यादीत नाव आहेत. मात्र घरकुलाचा त्यांना लाभ मिळत नाही. मात्र या तीन जणांना या योजनेत घरकुल मिळाले नसून यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप या तरुणांनी केला आहे. ते म्हणाले, त्यांच्या गावात घरकुल वाटपावरून ग्रामसेवक व सरपंच यांनी केलेल्या दुजाभावाने नाराज झालेल्या या तीन नागरिकांनी चक्क जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून घेतले. साष्ट पिंपळगाव येथील सरपंच व ग्रामसेवक यांचा निषेध व्यक्त करत या संबंधितांनी धनवान लोकांना घरकुलाचा लाभ दिल्यामुळे या नागरिकांचा रोष अनावर झाला व त्यांनी चक्क सोमवारी अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न करत संबंधित सरपंच ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तीन तरुणांनी हातात आणलेल्या डिझेलच्या बाटल्या डोक्यावर ओतल्या, दरम्यान आजूबाजूच्या काही नागरिकांनी या बाटल्या आणि काडीपेटीच्या डब्या त्यांच्याकडून हिसकावून बाजूला केल्या. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. यावेळी भाऊसाहेब सिताराम मोठे, शरद सकट आणि लक्ष्यण सकट या तिघांनी हा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे, या अचानक केलेल्या आंदोलनामुळे संपूर्ण जिल्हा परिषद परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आता जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी काय भूमिका घेतात या नागरिकांना न्याय मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हाभरात ग्रामसेवक व सरपंचाची मनमानी सुरु असते. ग्रामसेवक हा गावाच्या विकासाचा महत्वाचा कणा असतो. परंतु सरपंच हा राजकीय हेतूने गावातील गोर-गरीब लाभार्थ्यांना सरकारच्या लाभापासून वंचित ठेवत असतो. याला सरकारमधील ग्रामसेवकच खतपाणी घालत असतो. परंतु यांच्यावर कारवाई होत नसल्याने गावातून रोष करण्यात येतो. गावातील लोक ग्रामसेवक व सरपंचाची तक्रार करण्यास धजत नाहीत. परंतु आजच्या घटनेमुळे सरपंच व ग्राामसेवकांचा कारभार चव्हाट्यावर आला असून या दोघांविरोधात कडक कारवाई व्हावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या परिसरातून होत होती. दरम्यान गावातील विकास निधीची विल्हवाट कशी लावयाची आणि थातूर-मातूर विकास कामे झाले असे भासून सरपंच व ग्रामसेवक गावकर्यांसह सरकारची फसवणुक करतात. ही गंभीर बाब जिल्हाधिकार्यांसह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्षात घ्यावी, अशी मागणीही होत आहे.