जगभरातील क्रीडा रसिक ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात असा हाय व्होल्टेज हिंदुस्थान-पाकिस्तान सामना आज न्युयॉर्कमध्ये रंगणार आहे. दोन्ही देशांमधली चाहते मोठ्या संख्येने न्युयॉर्कमध्ये दाखल झाले आहेत. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या या दोन्ही देशातील चाहत्यांना पराभव पचवणे अवघड जाते. त्यामुळे दोन्ही संघांवर विशेष करुन पाकिस्तानवर या सामन्याचे अधिक दडपण असणार आहे. दुसरिकडे टीम इंडियाने T20 World cup ची धडाक्यात सुरुवात केल्यामुळे त्याच जोशात टीम इंडिया मैदानात उतरेल.
न्युयॉर्कच्या मैदानात आशिया खंडातील कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर येणार आहेत. आज रात्री 8 वाजता (हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार) सामन्याला सुरुवात होणार आहे. सामना सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाचे पारडे या सामन्यात जड मानले जात आहेत. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात आयर्लंडचा पराभव करत टी20 वर्ल्ड कपचा विजयी श्री गणेशा गेला. परंतू दुसरिकडे यजमान अमिरकेने धक्कादायकरित्या पाकिस्तानचा पराभव केला. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंवर कमालीचे दडपण असणार आहे. तसेच टीम इंडियाने जर पाकिस्तानचा पराभव केला, तर पाकिस्तानची सुपर-8 फेरीमध्ये जाण्याची वाट अवघड होणार आहे. दुसरिकडे टीम इंडियाचा विजय त्यांना सुपर-8 फेरीच्या दिशेने घेऊन जाईल.
टी20 वर्ल्ड कपचा इतिहास पाहिला तर टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आतापर्यंत एकूण 7 सामने झाले आहेत. यापेकी 6 सामने टीम इंडियाने, तर फक्त एका सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवण्यात यश आले आहे. त्यामुळे टीम इंडियाचे पारडे या सामन्यात जड मानले जात आहे.