रत्नागिरीत मुसळधार पाऊस; नागरिकांची त्रेधातिरपीट

रत्नागिरी जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. सांयकाळी आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.

कडक उन्हाळ्यामुळे रत्नागिरीकर हैराण झाले होते.गेले दोन दिवस ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पावसाची सर कोसळत होती. त्यामुळे रत्नागिरीकर पावसाच्या प्रतिक्षेत होते.सायंकाळी साडे पाच वाजता पावसाने हजेरी लावली. पहिल्या पावसात अनेकांनी भिजण्याचा आनंद लुटला. पहिल्याच पावसात रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे वाहनचालकांना कसरत करावी लागली. गेल्या 24 तासात जिल्ह्यात १५६.६० मिमी पाऊस पडला.त्यामध्ये चिपळूण ३३.२० मिमी,गुहागर २९.६० मिमी,संगमेश्वर २८.५०मिमी,रत्नागिरी ७.७० मिमी,लांजा ८.६० मिमी,राजापूर १२.४० मिमी,दापोली १९.मिमी,खेड ८.३० मिमी आणि मंडणगड ९.३० मिमी पाऊस पडला.