भंडारा जिल्ह्यात आधारभूत धान खरेदी केंद्रावर पणन हंगाम 2023-24 मध्ये 31 लाख क्विंटल धान खरेदी शासनाच्या वतीने करण्यात आली. मात्र मिलर्स संघटनेने धान भरडाई व हमाली रक्कम वाढवून द्यावी म्हणून आधारभूत धान खरेदी केंद्रावरून धानाची उचल केलीच नव्हती. त्यामुळे शासनाने खरेदी केलेला धान खरेदी केंद्रावर पडून होता. पण भंडारा जिल्ह्यातील मिलर्स यांनी धान उचल करत भरडाई केली. भंडारा जिल्ह्यात 60 टक्के धान भरडाई झाली असून 9 जिल्ह्यात तांदळाचा पुरवठा देखिल करण्यात आला आहे. विदर्भात सर्वात आधी धान भरडाई करण्यात भंडारा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे.