लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने आपल्या कार्यकारिणीची शनिवार, 8 जून रोजी बैठक बोलावली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही बैठक बोलावली असून, लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत पक्षाचे नेते चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. शनिवारी सकाळी 11 वाजता काँग्रेस मुख्यालयात ही बैठक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस दुसऱया क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला आहे आणि दहा वर्षांनी प्रथमच काँग्रेसकडे लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद असेल. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे प्रमुख नेते, आणि इतर नेते चर्चेत सहभागी होतील.