Monsoon 2024 : मुसळधार पाऊस कोसळणार! पुढील 5 दिवस राज्यातील जिल्ह्यांना IMD चा अलर्ट

संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी शुभ वार्ता आहे. हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा अंदाज वर्तवला आहे. राज्यात तळ कोकणात मान्सून दाखल झाला असून पावसाला सुरुवात झाली आहे. आता पुढील पाच दिवसांसाठी हवामान विभागाने राज्यातील जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे.

पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून मान्सूनबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे. हवामान विभागाकडून पुढील पाच दिवसांसाठी जिल्हास्तरीय सतर्कतेचा इशारा देण्यात आला. रत्नागिरी आणि सोलापूरपर्यंत मान्सूनचे आगमन झाले आहे. येत्या तीन-चार दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याची माहिती होसाळीकर यांनी ट्विटमधून दिली आहे.

पुढील 4 आठवडे राज्यात मुसळधार पाऊस

हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. 6 जून ते 13 जून, 13 जून ते 20 जून, 20 जून ते 27 जून आणि 27 जून ते 4 जुलै अशा चार आठवड्यांचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या अंदाजानुसार 13 जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल. त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

रत्नागिरीत पाऊस

कडक उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या रत्नागिरीकरांना आज सायंकाळी आलेल्या पावसाने दिलासा दिला. आज सायंकाळी रत्नागिरी शहरात ढगांनी आभाळ भरून आले आणि काही क्षणात वरूणराजा बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे रत्नागिरीकरांची त्रेधातिरपीट उडाली. पाऊस सुरू होताच अनेकांनी दुकानाचा आडोसा घेतला तर काही मंडळींनी पावसात भिजण्याचा आनंद लुटला.

पावसाच्या सरींनी हर्णेमध्ये रस्त्यावर तुंबले पाणी

पावसाच्या बरसलेल्या सरींनी दापोली तालुक्यातील हर्णेमध्ये रस्त्यावर पाणी तुंबले. त्यामुळे वाहनचालकांना त्रासाचे झाले तर उकाड्याने त्रासलेल्यांना सुखाच्या गारव्याचा दिलासा मिळाला. वातावरणात जाणवणारा असह्य उष्म्याचा कडाका सध्या सहन होईनासा झाला आहे. त्यातच हर्णेमध्ये अचानकपणे मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे घराबाहेर पडलेल्यांची एकच धावपळ उडाली. अचानक कोसळलेल्या पावसाच्या सरींनी रस्त्यावर पाणी तुंबले. यामुळे वाहनचालकांना मार्ग काढणे जिकरीचे होत होते.