सिंधू सलामीलाच गारद

हिंदुस्थानची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधू इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सलामीच गारद झाली. त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकसाठीच्या रंगीत तालीमच्या पार्श्वभूमीवर सिंधूसाठी हा मोठा धक्का होय. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत माजी जगज्जेत्या सिंधूला चीनी तैपेईच्या सू वेन-ची हिने 21-15, 15-21, 21-14 असे पराभूत केले. वेन-ची विरुद्ध सिंधूचा हा पहिलाच पराभव होय. ही लढत 1 तास 10 मिनिटांपर्यंत रंगली. महिला दुहेरीत ऋतुपर्णा पांडा व स्वेतपर्णा पांडा या हिंदुस्थानी जोडीला किम सो येओंग व कोंग ही योंग या सहाव्या मानांकित कोरियन जोडीने 21-12, 21-9 असे हरविले.