>> वैश्विक
आपल्या सूर्यमालेजवळचा दुसरा तारा, 4.3 प्रकाशवर्षे अंतरावर आहे. म्हणजे किलोमीटरच्या हिशेबात सुमारे 40 हजार वर्षे सेपंदाला तीन लाख किलोमीटर वेगाने प्रवास केल्यास या ताऱयापाशी जाता येईल. त्यातून केवळ सत्तर लाख किलोमीटर वजा केले तर या लाल-खुज्या (red dwort) ताऱयाभोवती फिरणाऱया प्रॉक्झिमा सेन्टॉरी बी नावाच्या ग्रहावर आपण जाऊ शकतो. हाच तो कदाचित जीवसृष्टी असलेला आपल्या सौरसंकुलाबाहेरचा सर्वात जवळचा ग्रह किंवा एक्झोप्लॅनेट.
हा प्रॉक्झिमा म्हणजे आपल्या ग्रहामालेला सर्वात जवळचा तारा आणि त्याभोवती फिरणारा ग्रह नरतुरंग पिंवा सेन्टॉरस या तारकासमूहात येतात. नरतुरंग हा पृथ्वीच्या दक्षिण अवकाशातील एक ठळक तारकासमूह. अर्धा मानव आणि अर्धा तुरंग (घोडा) अशा आकाराची कल्पना केल्यामुळे या तारकासमूहाचे नाव नरतुरंग-मार्च आणि एप्रिलमध्ये आपल्याकडून आकाश निरभ्र असलेल्या काळोख्या संध्याकाळी तो अवकाशात छान दिसतो.
एकतर या तारकासमूहातले तारे आपल्या ‘सौरसंकुलाजवळ’ असल्याने अभ्यासकांना त्याचं विशेष आकर्षण. याबाबतच्या ग्रीक आणि आपल्याही काही प्राचीन कथा आहेत. या तारकासमूहातील अतिशय तेजस्वी आहे तो ‘रिगेल सेन्टॉरस’ पिंवा ‘मित्र’ तारा. हा रात्रीच्या निरभ्र आकाशात चमकणारा तिसऱया क्रमांकाचा तेजस्वी तारा म्हणून ओळखला जातो. मात्र हा तारा एकटा नाही. तो आपल्या जोडीदारासह फिरतो ही गोष्ट रिचार्ड यांनी 1869 मध्ये हिंदुस्थानातील पुदुचेरी येथून दुर्बिणीद्वारे निरीक्षण करताना नोंदली. या ‘सिस्टिम’चं आणखी एक वैशिष्ट म्हणजे या ‘द्वैती’ (जोडगोळी) ताऱयांभोवतीही तिसरा तारा फिरत आहे. पहिले दोन तारे परस्परांभोवती सुमारे 80 वर्षात फिरतात तर हा तिसरा तारा 5 लाख वर्षात त्यांच्याभोवती परिक्रमा करतो. मूळच्या दोन ताऱयांपेक्षा हा आपल्याला जास्त जवळचा असल्यानेच त्याला ‘प्रॉक्झिमा’ म्हणतात.
सुमारे 65000 किलोमीटर व्यासाचा हा रक्तवर्णी खुजा सुर्याच्या तुलनेत केवळ 5 टक्के वस्तुमानाचा आहे. त्यावर सतत ज्वाला उफाळत असल्याने त्याला ‘फ्लेअर स्टार’सुद्धा म्हणतात. त्याभोवती फिरणारा जो ग्रह तो प्रॉक्झिमा-सेन्टॉरी-बी नरतुरंग तारकासमूह आपल्याला सर्वात जवळचा असल्याने त्याकडे अभ्यासकांचं विशेष लक्ष असतंच. ‘युरोपिअन सदर्न ऑब्झर्वेटरी’च्या अॅन्ग्लॉडा एॊस्क्युड या तरुण शास्त्रज्ञाने 24 ऑगस्ट 2016 या दिवशी प्रॉक्झिमा सेन्टॉरीभोवती फिरणारा ग्रह शोधून काढला.
आता प्रश्न असा आहे की या ग्रहाची वैशिष्टय़ कोणती? तिथे खरोखरच ‘जीवसृष्टी’ म्हणता येईल असं काही आहे का? मुळात आपण ‘जीवसृष्टी’ची कल्पना आपल्या ग्रहावरून करतो. पृथ्वीचं स्वतःच्या अक्षाशी साडेतेवीस अंशातील कलणं, चोवीस तासात स्वतःभोवती फिरणं. वर्षभरात जनकतारा सूर्याला परिक्रमा करणं आणि एक चंद्र (नैसर्गिक उपग्रह) योगायोगाने योग्य कक्षेत असणं शिवाय पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण, प्रचंड जलसाठा अशा कितीतरी गोष्टी आपल्या अस्तित्वामागे आहेत.
असं काही या ‘प्रॉक्झिमा सेन्टॉरी-बी’ वर आहे का? पिंवा तो जसा आहे त्याच नैसर्गिक परिस्थिती तिथे जीवसृष्टी निर्माण होऊ शकते का पिंवा झाली असेल का? पुन्हा ‘जीवसृष्टी’ असा भारदस्त शब्द म्हणजे तिकडे प्रगत सजीव असेल वगैरे. पण निदान प्राथमिक सजीव तरी असतील का हासुद्धास एक प्रश्नच. याचा अर्थ शोध थांबवायचा असा नाही तर अधिक सखोलतेने करायचा. विज्ञानात जेवढं आव्हान जास्त तेवढं संशोधन अधिक होतं. वारंवार चिकित्सा करत निष्कर्षाप्रत यावं लागतं आणि इतपं करून निष्कर्ष अयोग्य ठरले तर तेही स्वीकारावं लागतं. प्रयोगजन्य सत्यशोध हा विज्ञानाचा आधार असतो. तो मुलतः संकल्पना (अॅझम्शनवर) आधारीत असला तरी सुक्ष्म चिकित्सेनंतरच पूर्णत्व येतं.
प्रॉक्झिमा सेन्टारी-बी हा त्याच्या रक्तवर्णी ताऱयाच्या गतीशी ‘टायडल लॉक’ झालेला ग्रह आहे. म्हणजे त्याचा एकच भाग सतत सूर्याकडे असणार. (आपल्या चंद्राचा एकच भाग सतत आपल्याला दिसतो तसाच.) परिणामी या ग्रहाचा अर्धा भाग कायम अतिउष्ण तर दुसरा अतिशीत असणार. या स्थितीत तिथे सजीवांची निर्मिती समशीतोष्ण पट्टय़ातच होते का ते शोधावं लागेल.
या ग्रहाची त्याच्या ताऱयाभोवती फिरण्याची गती (म्हणजे त्याचं वर्ष) पृथ्वीच्या तुलनेत केवळ 11 दिवसांचं आहे. तो पृथ्वीच्या तुलनेत त्याच्या ताऱयाच्या 20 पट जवळ आहे. प्रॉक्झिमा सेन्टॉर्स नरतुरंग ताऱयांच्या निर्मितीच्याच वेळी ‘प्रॉटोस्टार’मधून तयार झालेला तारा आहे की नंतर ‘अल्फा सेन्टॉरी’ने गुरुत्वाकर्षणाने ‘पकडलेल्या’ (पॅप्चर्ड) आहे असाही एक प्रश्न आहे. म्हणजे त्याच्या ‘बी’ ग्रहाचा जन्मकाळही 5 अब्ज वर्षांचा नसेल. या ग्रहाला नसर्गिक उपग्रह असल्याचं अजूनपर्यंत निदर्शनास आलेलं नाही.
इतक्या ‘पण आणि परंतु’चा (इफ्स अॅन्ड बट्स) विचार करता तिथे ‘शेजारी’ जीवसृष्टी भाकित कसं करता येईल. तरीही तशी शक्यता मात्र आहे कारण सिद्धी प्राप्त होईपर्यंत विज्ञान शक्यता नाकारत नाही.